आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Homemade Bomb Hurled Outside The Sanargaon Pan Pacific Hotel In Dhaka Where President Pranab Mukherjee Is Staying.

बांगलादेशमध्‍ये प्रणव मुखर्जीच्‍या हॉटेलबाहेर बॉम्‍बस्‍फोट, राष्‍ट्रपती सुरक्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- बांगलादेशच्‍या दौ-यावर भारताचे राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी वास्‍तव्‍यास असलेल्‍या हॉटेलबाहेर बॉम्‍बस्‍फोट झाल्‍याचे वृत्त आहे. या स्‍फोटात कोणीही जखमी झाल्‍याचे वृत्त नाही. प्रणव मुखर्जीही सुरक्षित आहेत.

बांगलादेशात सध्‍या जातीय हिंसाचार भडकला आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामात 1971 मधील युद्ध गुन्‍ह्यांसाठी कट्टरवादी इस्‍लामिक नेत्‍यांना फाशीची शिक्षा ठोठावण्‍यात आल्‍यानंतर हिंसाचार सुरु झाला आहे. आतापर्यंत तयत 80 जणांचा मृत्‍यू झाला आहे. याच दरम्‍यान प्रणव मुखर्जी बांगलादेशच्‍या दौ-यावर गेले आहेत. ढाक्‍यात सनारगाव पॅन पॅसिफिक हॉटेलमध्‍ये त्‍यांचा मुक्काम आहे. या हॉटेलबाहेर काही जणांनी निदर्शने करुन गावठी बॉम्‍ब भिरकावला. हॉटेलजवळच स्‍फोट झाला. परंतु, कोणीही जखमी झाल्‍याचे वृत्त नाही.