आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • A Joint Team Of CBI And Defence Ministry To Leave For Italy Tomorrow In Connection With The VVIP Chopper Deal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताला इटालियन दणकाः हेलिकॉप्‍टर प्रकरणाची कागदपत्रे देण्‍यास इटली कोर्टाचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशामध्‍ये खळबळ उडविणा-या व्‍हीव्‍हीआयपी हेलिकॉप्‍टर खरेदीप्रकरणातील दलाली देणारा आरोपी क्रिश्चियन मिशेल याचा पिता वॉल्‍फगँग याने एकेकाळी कॉंग्रेस अध्‍यक्ष सोनिया गांधी यांची हेरगिरी केली होती. वॉल्‍फगँग यांचा कॉंग्रेस तसेच भारतीय गुप्‍तचर संस्‍थांसोबत घनिष्‍ठ नाते होते. दरम्‍यान, हेलिकॉप्‍टर खरेदी प्रकरणाची चौकशी करण्‍यासाठी सीबीआय आणि संरक्षण मंत्रालयाचे एक संयुक्त पथक उद्या इटलीला रवाना होणार आहे. तेथील अधिका-यांची भेट घेऊन याप्रकरणातील सविस्‍तर माहिती हे पथक घेणार आहे. परंतु, इटलीच्‍या न्‍यायालयाने भारतासोबत या प्रकरणातील माहिती तसेच कागदपत्रे देण्‍यास स्‍पष्‍टपणे नकार दिला आहे.

इटालियन तपास अधिका-यांच्‍या चौकशीमध्‍ये या घटनांचा खुलासा झाला आहे. मिशलला व्‍यवसायाचा मोठा वाटा वडिलांकडूनच मिळाला होता. पी. व्‍ही. नरसिंह राव पंतप्रधान होते त्‍यावेळेस त्‍यांनी सोनियांची हेरगिरी करण्‍यासाठी 'रॉ'ला सांगितले होते. 'रॉ'ने हे काम एका एजंसीकडे काम सोपविले होते. त्‍यावेळी सोनिया गांधी लंडन दौ-यावर होत्‍या. त्‍यांची हेरगिरी करण्‍याचे काम वॉल्‍फगँगकडे होते. सोनिया गांधी कॉंग्रेसमध्‍ये नेत्‍या म्‍हणून उदयास येण्‍याची राव यांना चिंता होती. त्‍यामुळे राव हे सोनियांबाबत इत्‍यंभूत माहिती ठेवत असत.

वॉल्‍फगँग हा शस्‍त्रास्‍त्र खरेदीच्‍या व्‍यवहारात सहभागी होता. तसेच तो अतिशय प्रभावशाली होती. भारतीय गुप्‍तचर यंत्रणा त्‍याला तीन दशकांपासून अतिशय विशेष व्‍यक्ती म्‍हणून मानत होती. त्‍याला 'वॉल्‍टर्स' या नावाने भारतीय वर्तुळात ओळखले जात होते. कॉंग्रेसच्‍या अनेक वरिष्‍ठ नेत्‍यांच्‍या तो संपर्कात होता. पाकिस्‍तानने 80 आणि 90 च्‍या दशकात खरेदी केलेल्‍या शस्‍त्रास्‍त्रांची गोपनिय माहिती त्‍यानेच भारताला पु‍रविली होती.