आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलपासून मिळणार 'आकाश'ची नवी आवृत्ती, 'डाटाविंड'सोबतचा करार राहणार कायम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः जगातील सर्वात स्‍वस्‍त टॅबलेट असलेल्‍या 'आकाश'साठी नव्‍याने निविदा मागविण्‍यात येणार आहेत. भविष्‍यात तब्‍बल 22 कोटी टॅबलेटची गरज भासणार असून त्‍यासाठी ही प्रक्रीया करावीच लागणार असल्‍याचे मनुष्‍यबळ विकास मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे. मनुष्‍यबळ विकास मंत्री कपिल सिब्‍बल यांनी यासंदर्भात माहिती देताना डाटाविंडसोबतचा करार कायम राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.
'डाटाविंड'ला सरकारने सध्‍या 1 लाख टॅबलेटची ऑर्डर दिली होती. त्‍यापैकी 30 हजार टॅबलेट त्‍यांनी पुरविले आहेत. उर्वरित टॅबलेटही ते लवकरच पुरविणार असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. परंतु, काही तक्रारींनंतर कंपनीने 'आकाश'च्‍या पहिल्‍या आवृत्तीचे उत्‍पादन करणे बंद केले आहे. कंपनीने नव्‍या टॅबलेटवर काम करणे सुरु केले असून त्‍याची किंमती काही प्रमाणात जास्‍त राहील. या प्रकल्‍पावर सरकार मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करणार आहे. सध्‍याच्‍या आवृत्तीमध्‍ये सुधारणा करुन नवी आवृत्ती एप्रिलपासून मिळायला सुरुवात होणार आहे. तसेच डाटाविंडकडून उर्वरीत 70 टॅबलेट हे नव्‍या आवृत्तीचेच राहतील, असेही सिब्‍बल यांनी स्‍पष्‍ट केले आहे.
'आकाश'च्‍या विद्यमान आवृत्तीबाबत अनेक तक्रारी आल्‍या होत्‍या. तसेच तपासणीवरुन आयआयटी जोधपूर आणि डाटाविंडमध्‍ये वाद निर्माण झाला होता. त्‍यानंतर सरकारने 'आकाश' नावाच्‍या व्‍यावसायिक वापरासाठी बंदी घातली. भविष्‍यातील गरजेसाठी नव्‍याने निविदा मागविण्‍यात येणार आहेत. त्‍यात 'डाटाविंड'लाही सहभागी होता येईल.
केंद्राकडून 'आकाश' प्रकल्‍प रद्द, नावाच्‍या व्‍यावसायिक वापरावरही बंदी
'आकाश' टॅबलेटसाठी ऍप बनविणार्‍याला मिळणार एक लाख रुपये
आकाश कॉम्प्युटर खरेदीसाठी प्रचंड गर्दी