आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा ‘आकाश 2’ एप्रिलमध्ये येणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांना स्वस्त टॅबलेट पीसी देण्याच्या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ‘आकाश’बद्दल आयआयएम जोधपूरच्या तक्रारीनंतर सरकार नवा अपग्रेडेड ‘आकाश-2’ एप्रिलमध्ये सादर करणार आहे. मागणी लक्षात घेता अनेक कंपन्यांना या निर्मितीचे कंत्राट दिले जाईल.
मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यातील 30 हजार आकाश टॅबलेटच्या निर्मितीचे कंत्राट डाटाविंड या कॅनडाच्या कंपनीकडे होते. मात्र याबद्दल तक्रारी आल्यावर आता नवीन निर्मात्यांचा शोध सुरू झाला आहे