आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आंख’ प्रणाली लवकरच; नव्या स्वदेशी रडारमधून क्षेपणास्त्रांचीही सुटका नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय आकाशाची सुरक्षा अभेद्य करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. त्या दिशेने जूनमध्ये प्रगतीचा मोठा टप्पा साध्य होणार आहे. या महिन्यात ब्राझीलकडून एमब्रेअर लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. या विमानावर स्वदेशी रडार प्रणाली व अ‍ॅन्टेना बसविण्यात येणार असून हे विमान आकाशातील शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले जाणार आहे. रडार प्रणालीने सज्ज असलेल्या लढाऊ विमानाचे नाव ‘आंख’ असे असणार असून त्याच्या नजरेतून क्रूझ क्षेपणास्त्रेही सुटू शकणार नाहीत. त्यामुळे भारतीय आकाश अभेद्य होणार आहे.
आकाशाची नजर या नावाने ओळखल्या जाणा-या या लढाऊ विमानाने ब्राझीलमध्ये उड्डाणाच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ)कडून याचा वापर ‘प्लॅटफॉर्म’ सारखा करणार आहे. या प्लॅटफॉर्मवर स्वदेशी रडार, सेन्सर व स्कॅनिंग सिस्टम यासारख्या अत्याधुनिक प्रणालीद्वारे सज्ज करण्यात येणार आहे. त्यामुळे हे विमान एकाच वेळी 500 लक्ष्यांवर नजर ठेवून त्यांची पडताळणी करू शकेल. या विमानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते 260 अंशांमध्ये फिरुन सभोवती नजर ठेवू शकेल. जमिनीवर तैनात असलेली रडार प्रणाली साधारणत: कमी उंचीवर उडणा-या वस्तूंची योग्य प्रकारे निगराणी करू शकत नाहीत. डीआरडीओच्या म्हणण्यानुसार या विमानावर बसवण्यात आलेल्या रडार प्रणालीमुळे क्रूझ क्षेपणास्त्रांची पडताळणी करणेही सहज शक्य होणार आहे.
मित्र आणि शत्रू ओळखणार
या रडार प्रणालीतील सॉफ्टवेअरद्वारे धमक्यांची पडताळणी करता येणार आहे. युद्ध व्यवस्थान व इंटरसेप्टसारख्या क्षमतांही त्यात आहेत. टेहळणीसाठी त्यात बसवण्यात आलेले सेन्सर मित्र आणि शत्रूंची ओळख अचूक प्रकारे करू शकेल. या प्रणालीचे नाव आयएफएफ (आयडेंटिफिकेशन आॅफ फ्रेंड आॅर फो सिस्टम) असे असून ती सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टम बंगळुरूने विकसित केली आहे.