आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचार्य बाळकृष्‍ण यांच्‍या जीवाला धोकाः दिग्विजय सिंह, रामदेव बाबांवरच संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदुर- योगगुरु रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बाळकृष्‍ण यांच्‍या जीवाला धोका असल्‍याची भीती कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी व्‍यक्त केली आहे. परंतु, दिग्विजय यांनी रामदेव बाबा यांच्‍यावर संशय व्‍यक्त केला आहे.
इंदुरमध्‍ये एका कार्यक्रमादरम्‍यान दिग्विजय सिंह म्‍हणाले, आचार्य बाळकृष्‍ण यांच्‍या जीवाला धोक आहे. त्‍यांना कडक सुरक्षा दिली पाहिजे. रामदेव बाबा यांची सर्व रहस्‍ये जाणणारे ते एकमेव व्‍यक्ती आहेत. ही रहस्‍ये उघडकीस येऊ नये, यासाठी त्‍यांची हत्‍या करण्‍यात येऊ शकते. त्‍यामुळे त्‍यांची सुरक्षा वाढविण्‍यात यावी, असे सिंह म्‍हणाले.
आचार्य बाळकृष्‍ण यांना दोन आठवड्यांपूर्वी सीबीआयने अटक केली होती. बनावट पासपोर्ट आणि बनावट पदवीप्रकरणात त्‍यांच्‍यावर ही कारवाई करण्‍यात आली आहे. बाळकृष्‍ण हे मुळचे नेपाळचे आहेत.
रामदेव बाबांच्या उपोषणासाठी टीम अण्णाला निमंत्रण नाही!
टीम अण्‍णाची राष्‍ट्रपतींवर टीका चुकीचीः रामदेव बाबांची विरुद्ध भूमिका
रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्‍ण यांना अटक
आचार्य बाळकृष्‍ण यांची आजपासून सीबीआयकडून चौकशी