आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघानंतर आता अडवाणी यांनीही केली मोदींची पाठराखण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीचा प्रचार केला जात आहे, असे अडवाणी यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले आहे. मोदींनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या गुजरात दौ-याला विरोध केला नव्हता असेही अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. अडवाणी यांनी या दाव्यासोबतच कलाम यांच्या 'टर्निंग पॉईंट' या पुस्तकाचाही उल्लेख आपल्या ब्लॉगवर केला आहे.
अडवाणी यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले आहे की, वाजपेयी आणि मोदी यांच्या विरोधात चुकीचा प्रचार केला जात आहे की, गुजरात दंगलीनंतर हे दोघे कलाम यांच्या दौ-याच्या विरोधात होते. मोदी कलाम यांना घेण्यसाठी स्वतः विमानतळावर गेले होते. एवढेच नाही तर, कलाम ज्या ठिकाणी गेले त्या सर्वठिकाणी मोदी त्यांच्यासोबत गेले होते.
काही दिवसांपूर्वी एनडीएच्या सहयोगी जेडी(यू) पक्षाने मोदीवर काही आरोप केले होते, त्यानंतर संघाने गुजरातच्या मुख्यमंत्र्याची पाठराखण करत, नितीश कुमार यांना चांगलेच खडसावले होते.
पंतप्रधानपदासाठी धर्मनिरपेक्ष नेत्यानेच दावा करावा : नितीश