आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींनी ब्लॉगवर केली २०१४ लोकसभा निवडणूकीची भविष्यवाणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांनी आगामी लोकसभा निवणूकीत काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. अडवाणींनी त्यांच्या ब्लॉगवर २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतरही भाजपचा पंतप्रधान होणार नसल्याचे म्हटले आहे. तर त्यांनी तिसरी आघाडी सत्तेत येण्याची शक्यताही नाकारली आहे.
२०१४ मधील लोकसभा निवडणूकी संदर्भात भविष्यवाणी करताना अडवाणी लिहितात, 'काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळणे अवघड आहे. तर भाजपही बहुमताच्या जादूई आकड्याला स्पर्ष करु शकणार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यापेक्षा सहकारी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान करण्याची शक्यता अधिक आहे.'
भाजप नेते अडवाणी यांनी त्यासाठी काही उदाहरणे दिली आहेत. ते लिहितात, 'चौधरी चरण सिहं, चंद्रशेखर, एच.डी.देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांना काँग्रेसने समर्थन दिले होते. तर, व्ही.पी.सिहं यांना भाजपचा पाठिंबा होता. मात्र, असे सरकार जास्त दिवस टीकत नाही.'
अडवाणींनी तिस-या आघाडीचे सरकरा स्थापन होण्याची शक्यता नाकारली आहे. ते लिहितात, 'तिसरी आघाडी सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असणार नाही.'
अडवाणींनी ब्लॉगमध्ये दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिलेल्या भोजनाचा उल्लेख केला आहे. त्यावेळी त्यांची दोन केंद्रीय मंत्र्यांशी अनौपचारीक चर्चा झाली होती. ते लिहितात, 'या मंत्र्यांशी झालेल्या चर्चेवरून त्यांची त्यांची चिंता स्पष्ट होते. त्यांना शंका आहे की, आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस आणि भाजप प्रणित आघाडीकडे एवढे बहुमत नक्कीच नसणार की ते सरकार स्थापन करु शकतील. त्यांना वाटत आहे की, २०१३ किंवा २०१४ मध्ये जेव्हा निवडणूका होतील तेव्हा तिसरी आघाडी सत्तेत येईल. काँग्रेस मंत्र्यांना वाटते की, हे भारतीय राजकारण आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने चांगले नाही.'
काँग्रेसने अडवाणींच्या या ब्लॉगवर म्हटले की, 'अडवाणींनी काँग्रेस विषयी विचार करण्यापेक्षा भाजपची चिंता करावी.' काँग्रेस नेते सत्यव्रत चतुर्वेदी म्हणाले, 'हा ब्लॉग म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाची परिणीती आहे.'
'गुप्त बैठकीत' नितीशकुमारांनी घेतले आश्वासन, मोदी नसतील पंतप्रधानपदाचे उमेदवार
नरेंद्र मोदी आत्महत्या करणार होते- केशूभाई पटेलांचा खळबळजनक दावा
'नरेंद्र मोदी हे सडलेले फळ, या गेंडयाला बाहेर फेका'
भाजप आमदार विरोधीपक्ष नेते खडसेंवर नाराज
प्रणवदांच्‍या विरोधात भाजप कोर्टात जाणार!
मोदींविरोधात आणखी एक पोस्‍टर: भाजप नेत्‍यांचा खूनी असल्‍याचा उल्‍लेख
भाजप संकटात : कर्नाटकात राजीनामासत्र, गुजरातमध्येही बंडाचा झेंडा