आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advocate Association, On Road Against Cm Mamta Banejee At Kolkarta

ममता बॅनर्जींच्या विरोधात कोलकात्यात वकिलांचा मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या न्यायव्यवस्थेवरील कथित वक्तव्याच्या निषेधार्थ कोलकात्यातील वकील संघटना शुक्रवारी रस्त्यावर उतरली. हातात पोस्टर घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या वकीलांनी ममता यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
न्यायव्यवस्थेतील एक वर्ग भ्रष्ट आहे. तसेच पैशांच्या बदल्यात न्यायव्यवस्थेतील अनेक खटल्यांचे निकाल बदलले जातात, असे वक्तव्य ममतांनी एका कार्यक्रमात केले होते. ममतांनी न्यायव्यवस्थेचा अवमान केला असून त्यांच्याविरुद्ध खटला चालविला पाहिजे, अशी मागणी कोलकात्यातील वकीलांनी एका याचिकेद्वारा केली आहे.
न्यायव्यवस्थेवरील वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनर्जींनी स्वतःचा बचाव केला आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे ममतांनी सांगितले आहे. निवडणुका, न्यायव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेततील सुधारणांबाबत वक्तव्य केल्याचे ममतांनी सांगितले आहे. देशातील व्यवस्थेबाबत चूका दाखवणे गुन्हा असेल तर तो आपण हजार वेळा करण्यास तयार असल्याचेही ममतांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जींनी केले राज्याच्या परंपरेचे उल्लंघन
ममता हॉस्पिटलवर तुफान दगडफेक
हुकूमशाह आहेत ममता बॅनर्जी- मार्कंडेय काटजू