आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशात वकिलाने थाटले नेताजींचे संग्रहालय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रपाडा - कोर्ट-कचे-या च्या धावपळीत वकीलही छंद जोपासू शकतो, याचे उत्तम उदाहरण ओडिशामध्ये समोर आले आहे. बालवयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराने भारावलेल्या महंमद मुश्ताक या वकिलाने तीन दशकांच्या अथक परिश्रमानंतर नेताजींशी संबंधित वस्तंूचे संग्रहालय तयार केले आहे.

जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरशी नेताजींनी केलेले हस्तांदोलन, नभोवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण, अंदमान तुरुंगाला दिलेली भेट, रासबिहारी बोस यांच्याकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची स्वीकारलेली सूत्रे, कुटुंबीयांसोबत झालेला संवाद याबाबतच्या स्मृतींचे जतन मुश्ताक यांनी आपल्या संग्रहालयात केले आहे.
लहान वयात मुलांवर बॉलीवूड अभिनेत्यांची छाप असते. मात्र, मी नेताजींचा चाहता होतो. त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे संपूर्ण नेताजी समजून घेण्याची माझी जिज्ञासा वाढली. त्यानंतर मी नेताजींविषयीचा संग्रह जमा करण्यास सुरुवात केली, असे 45 वर्षीय मुश्ताक म्हणाले.नेताजींची दुर्मिळ छायाचित्रे जमा करणे कठीण काम होते. छायाचित्रासाठी प्रसंगी बरेच पैसेही मोजावे लागले. नेताजींच्या हस्तलिखिताव्यतिरिक्त संग्रहालयामध्ये त्यांची पत्रे, मासिके व नाण्यांचा समावेश आहे.
तिकिटे, नाणी, पत्रांचा समावेश
स्वतंत्र मणिपूरच्या पार्श्वभूमीवर नेताजींवर टपाल तिकीट काढण्यात आले होते. 1913 मध्ये ओडिशा व बिहार सरकारने नेताजींची उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याची राजपत्रातील अधिसूचना, इंडियन नॅशनल आर्मीतील (आयएनए) कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी लिहिलेल्या पत्राचा समावेश या संग्रहालयात आहे. नेताजींनी प्रकाशित केलेल्या मासिकाची मूळ प्रत, आयएनए बासुमती, बंगाली मासिक ‘मिनिंग ऑफ लेफ्टीझम’, तसेच नेताजींनी लिहिलेला लेख मुश्ताक यांच्या संग्रहालयात आहे.