आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Barbaric Act There Cannot Be Business As Usual With Pakistan PM

मनमोहन सिंगांनी पाकिस्तानला ठणकावल्यानंतरही पाककडून \'एलओसी\'वर फायरिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन दोन भारतीय जवानांची क्रूरपणे हत्या केल्यानंतर प्रथमच जाहीर वक्तव्य केलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. भारतीय जवानांची शिरच्छेद केल्याने आता पूर्वीसारखे संबंध भविष्यात राहणार नाहीत, असे सिंग यांनी पाकला ठणकावले आहे.
भारत आणि पाकिस्तान सीमेवर (एलओसी) पाक जवानांनी जे काही कृत्य केले आहे ते कदापी स्वीकारली जाणार नाही. पाकिस्तानने या घटनेकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. ज्या जवानांनी या क्रूर हत्या घडवून आणल्या आहेत. त्यांना पाकिस्तानने कठोर शिक्षा करायला हवी. शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार होत असल्याने ही घटना सहज घेण्यासारखी नाही, असेही पंतप्रधान सिंग यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नवी दिल्लीतील एका लष्कराने आयोजित केलेल्या समारोपात बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकला ठणकवल्यानंतरही एलओसीवर आज सायंकाळी सहाच्या सुमारास पाकने फायरिंग केली. मात्र, भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले नाही. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.