आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठीण संघर्षानंतरच यश मिळते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - सहाव्या जयपूर लिटररी फेस्टिव्हलच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी आज स्त्रीवादी साहित्यिकांचा आवाज गुंजला. ‘आप मर्द है, इन्सान कब बनोगे?', ‘हमारी त्वचा का रंग जो भी हो, दुखों का रंग एक-सा है,’ ‘संघर्ष से ना डरे, संघर्ष के बाद ही सफलता है’, अशा घोषणा टाळ्यांच्या कडकडाटात दिल्या गेल्या. उपस्थित तरुण मुलींना हा आशावाद आणि बहनाप्याची सिस्टरहूड हाक फार भावली.

राजस्थानातील पहिल्या महिला तुरुंग अधीक्षक व कवयित्री प्रीता भार्गव, ज्येष्ठ लेखिका लता शर्मा, दिल्लीस्थित लेखिका सुशीला शिवरान यांना स्त्री होकर सवाल करती हो, या सत्रात तरुण लेखक दुष्यंत यांनी बोलते केले. सिमोन द बूवा, तस्लिमा नसरीन यांच्या लिखाणातील वचने उद्धृत करत दुष्यंत यांनी उपस्थितांना जिंकून घेतले.

चर्चेदरम्यान तिन्ही वक्त्यांनी महिलांना संघर्षाचा सल्ला तर दिलाच, परंतु तो सोपा नाही, याचीही जाणीव करून दिली. ‘काटों पर से गुजरना होगा, अंगारों को झेलना होगा,’ असे प्रीता भार्गव म्हणाल्या. ‘आर्थिक स्वातंत्र्यातूनच सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची वाट जाते,’ या लेखिका प्रभा खेतान यांच्या वाक्याची आठवण करून देत लता शर्मा म्हणाल्या की, ज्या घरांमधून मुलींना त्यांच्या शिक्षणावर खर्च होणा- पैशाची आठवण सतत करून दिली जाते, त्या मुलींनी शिकवण्या घेऊन शिक्षणाचा भार उचलावा.

आजच्या मुली पुरुषांशी बरोबरी करायची म्हणून सिगरेट ओढतात, दारू पितात, त्याबद्दल उपस्थित प्रेक्षकांनी तक्रारीचा सूर काढला. त्यावर मुलींनी सिगरेट ओढून कर्करोगाला जवळ करण्याची गरजच काय? असा प्रश्न सुशीला शिवरान यांनी विचारला. इतक्या शतकांची अंगांगात भिनलेली पुरुषवादी शिकवण कंडिशनिंग संपायला वेळ लागेल, तो आपण दिला पाहिजे. आताची पिढी हळूहळू महिलांना समजू लागली आहे, अशी आशा प्रीता भार्गव यांनी व्यक्त केली. आणि आधी काय झालं, त्याच्याबद्दल तक्रार करणं बंद करा, असा सल्ला लता शर्मा यांनी दिला.