आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझलला फाशी द्यायला नको होती - ओमर अब्दुल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अफझल गुरूला फाशी द्यायला नको होती, अशी भावना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी व्यक्त केली. फाशीपूर्वी बाळगण्यात आलेली गुप्तता आणि सरकारी प्रक्रियेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ‘कसाबला फाशी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने माझ्याशी काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चर्चा केली होती. अफझलला फाशी दिली तर काश्मीर पेटून उठेल, असा इशारा मी तेव्हाच दिला होता.’ अफझलच्या कुटुंबीयांना फाशीबद्दल माहिती दिली गेली नाही याबद्दल त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. स्पीड पोस्टने या निर्णयाची माहिती कळवणे अनाकलनीय असल्याचेही ते म्हणाले. फाशी देण्याच्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले गेले नसल्याचे सांगून या प्रकरणात न्याय मिळाला नाही, अशी काश्मिरींची भावना होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.

काश्मीरमध्ये संचारबंदी कायम
दुस-या दिवशीही काश्मीरमध्ये संचारबंदी होती. शनिवारी संचारबंदी झुगारून लोकांनी निदर्शने केली होती. रविवारी मात्र राज्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
... भाजप गप्प का?
भाजपवर ओमर यांनी टीका केली. राजीव गांधी व बिअंतसिंग यांच्या मारेक-यांना फासावर लटकाविण्याची मागणी भाजपवाले का करत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.