आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afzal Guru Had Written A Final Letter To His Wife

माझ्या मृत्‍यूचा शोक व्‍यक्त करु नकोः अखेरच्‍या पत्रातून अफझलने पत्‍नीला दिले धैर्य

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- फासावर चढविल्‍या जाण्‍यापूर्वी अफझल गुरुने पत्‍नी तबस्‍सूमला एक पत्र लिहीले होते. उर्दूमध्‍ये लिहीलेल्‍या या पत्रात त्‍याने तिला धैर्य राखण्‍यास सांगितले होते.

तिहार तुरुंगाच्‍या एका अधिका-याने सांगितले, अफझलने तुरुंग अधीक्षकांच्‍या हाती हे पत्र लिहीले होते. ते कोणत्‍याही परिस्थितीत पत्‍नीपर्यंत पोहोचवा, असे अफझलने सांगितले होते. हीच त्‍याची अखेरची इच्‍छा होती. पत्रातून त्‍याने पत्‍नीला साहस आणि धैर्य राखण्‍याचा सल्‍ला दिला होता. त्‍याने मुलाबाबत चिंता व्‍यक्त केली होती. स्‍वतःसोबत मुलाची काळजी घे, असे अफझलने पत्‍नीला सांगितले होते. हे पत्र अतिशय खासगी होते. ते एकांतात वाच, गरज भासल्‍यास सार्वजनिक कर, असेही त्‍याने तिला सांगितले होते.

तुरुंगातून अफझल नेहमी कुटुंबियांना पत्र लिहायचा. त्‍यासाठी तो पेन आणि कागद नेहमी मागायचा. प्रत्‍येक पत्रातून कुटुबियांची किंवा घराची चिंता व्‍यक्त व्‍हायची.