आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशी केवळ मलमपट्टी, जखमा अजून ताज्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसद हल्ल्यातील शहिदांच्या कुुटुंबीयांच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. परंतु अफझल गुरूला फाशी झाल्याने त्यावर काही प्रमाणात मलमपट्टी मात्र झाली आहे. शहीद उपनिरीक्षक नानक चंद यांची पत्नी गंगा देवी यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा काही बोलण्याअगोदर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

मुलगा दहशतवादी असेल तर त्यालाही द्या फाशी : दहशतवाद्याला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. त्याला कसले नातेही लागू होत नाही. तो देशाचा गुन्हेगार असतो. त्याला केवळ फाशी झाली पाहिजे. तो माझा मुलगा असला तरी बेहत्तर. त्यालाही फासावर लटकवा. आजही कायदा जिवंत आहे. या गोष्टीची जाणीव अफझलला झालेल्या फाशीवरून पुन्हा एकदा झाली आहे, असे गंगादेवी म्हणाल्या.

न्यायदानाच्या गतीने जखमा उकरल्या : शहीद हेड कॉन्स्टेबल विजेंद्र सिंग यांची पत्नी जयवती म्हणाल्या, या प्रकरणात न्यायदानाची प्रक्रिया मंदगतीने चालली. त्या काळात आमच्या जखमी उकरल्या जात होत्या. ही लढाई सोडणार नसल्याचा आमचा निर्धार होता. देशाच्या गुन्हेगाराला फाशी झाल्याचा आनंद आहे.

आज काळीज शांत झाले : सरदार सिंग यांनी मुलगा ओमप्रकाशला घटनेत गमावले. ते म्हणतात, जखमांना व्यक्त करणे सोपे नाही. वृद्धापकाळी मुलगा हाताची काठी होईल, असे वाटले होते. परंतु दहशतवाद्यांमुळे मलाच त्याला खांद्यावरून न्यावे लागले. अफजलला झालेल्या फाशीमुळे काळिज शांत झाले आहे.

आनंदात जेवणही विसरले : पती मातबर सिंग नेगी यांना गमवणा-या कल्पा देवी म्हणाल्या- अफजलला फाशी झाल्याचे सकाळी समजले. तेव्हापासून आनंदाला पारावार उरला नाही. एवढा आनंद झाला की सांगू शकत नाही. आज जेवण करायचेही विसरून गेले. उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला.

कोणतेही वचन पूर्ण झाले नाही : शहिद उपनिरीक्षक घनश्याम यांचा मुलगा बच्चू सिंग म्हणाला- अफजलला फाशी झाल्याचा आनंद आहे. सरकारने अनेक वर्षे त्याचा सरकारने पाहुणचार केला. याची मात्र खंत वाटत राहिल. आम्हाला अजुनही पुरेशी मदत मिळालेली नाही. कोणी ऐकून घेणारेच नाही.