आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर बेअंत सिंग आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशी कधी मिळणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफझल गुरुला केंद्र सरकारने फाशी दिली तरी त्याचा त्यांना राजकीय फायदा होणार नाही. उलट, देशाच्या जनतेत हा संदेश जाईल की, सरकार मूळ मुद्ये सोडवण्यात अपयशी ठरली आहे. आणि आता असे निर्णय घेऊन सरकार आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रय़त्न करीत आहे. त्या अर्थाने थोड्या मात्र प्रमाणात सरकारला फायदा होऊ शकतो.

अफझलला फाशी देण्याचा निर्णय एक धाडसी निर्णय आहे. मात्र याचे श्रेय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यापेक्षा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना दिले पाहिजे. कारण मुखर्जींनी प्रतिभा पाटील यांच्याप्रमाणे फाईल्स प्रलंबित ठेवल्या नाहीत. जेव्हा गृहमंत्री शिंदेंचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे कोणतेही विधान विश्वसनीय वाट नाही. ते भाजप आणि आरएसएसला दशहतवादाच्या ट्रेनिंग कॅंपला जोडतात मात्र कोणतेही ठोस कारवाई करीत नाहीत. कसाबच्या फाशीवेळी जेव्हा त्यांना अफझल गुरुच्या फाशीबाबत विचारले होते तेव्हा त्यांनी गुरुची फाईल्स माझ्यापर्यंत आली नसल्याचे सांगितले होते.

सरकार सध्याच्या काळात इतकी अडकली आहे की, त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही.। महागाई वाढली आहे, वित्तीय तोटा 20 टक्क्यांवर गेला आहे. सरकार बलात्कारासारख्या घटना रोखण्यास असमर्थ ठरली आहे. अशावेळी शांततेच्या (राजकीय) काळात आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र प्रश्न हा आहे की, पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग आणि राजीव गांधी यांच्या मारेक-यांना फाशी कधी होणार? लोकांच्या नजरेत मनमोहन सरकारची प्रतिमा एक नेभळट सरकार म्हणून आहे ती काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता लक्षात येताच आता त्यांनी काही लोकभावनेला धरुन निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र हा केवळ देखावाच ठरु शकतो.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे मोदींच्या बाजूने देशात तयार होऊ लागलेले वातावरण यामुळे काँग्रेस गोधळली असल्याचे चित्र आहे. अशावेळी अफझल गुरुला फाशी देऊन देशातील हिंदूना भाजपकडे जाण्यापासून थोपविण्याचाही हा प्रयत्न आहे. मात्र आता यावर भारत- पाकिस्तान संबंधावर काय परिणाम होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतात पाक प्रायोजित दहशतवादी कारवाया चालतात मात्र पाक सरकार कायमच ते नाकारत आले आहे. अशावेळी मनमोहन सरकार पाकिस्तानबाबत काय भूमिका घेते ते महत्त्वाचे ठरेल. कारण काँग्रेस सरकार ही देशातील अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमांना कायमच कुरळवण्याचा प्रयत्न करीत आली आहे.

लेखक हे राजकीय विश्लेषक असून वरील मत हे त्यांचे वैयक्तिक स्वरुपाचे आहे.