आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझलच्या फाशीमुळे 11 वर्षांची बेचैनी संपली, दिलासा मिळाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिकर / निमकाथाना - संसद हल्ल्यातील शहीद जगदीश यादव यांच्या कुटुंबीयांनी अफझलला झालेल्या फाशीमुळे दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अफझलला फाशी व्हावी, या मागणीसाठी जेपी यांच्या पत्नी प्रेमा देवी यांनी सन्मानार्थ मिळालेली पदके परत केली होती. फाशी झाल्यानंतरच ती स्वीकारू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. आता हा सन्मान स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे प्रेमादेवी यांनी सांगितले. अकरा वर्षानंतर दिलासा मिळाला अशी जेपी यांच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया होती. मुलाच्या बलिदानाला आपल्या हयातीत तरी न्याय मिळावा, असे जेपी यांच्या आई शिमला देवी यांना वाटत होते. जेपीचा फोटो हाती घेत भावना व्यक्त केल्या. जेपी यादव स्मारकावर लोकांनी फटाके वाजवून, मिठाई वाटून आनंद साजरा केला.

फाशीचा आनंद असला तरी सरकारवर नाराजी : एएनआयचे कॅमेरामॅन विक्रांत बिस्ट यांची पत्नी सुनीता यांनी अफझलच्या फाशीवर आनंद व्यक्त केला. दहशतवादी घटनेला जगासमोर आणत असताना माझ्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर सरकारने आम्हाला मदत केली नाही. सरकारने पेट्रोल पंप देण्याचे जाहीर केले होते. परंतु आजपर्यंत आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.

मला पपांचा चेहराही आठवत नाही : अनेकदा वाटते, पपा असते तर मी त्यांच्यासोबत खेळलो असतो. फिरलो असतो. पण खरे तर मला त्यांचा साधा चेहराही आठवत नाही. तेव्हा मी तीन वर्षांचा होतोे. त्याचे वडील देशराज सीबीडब्ल्यूडीमध्ये माळीकाम करत. संसद हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.