आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटकेनंतर अफझल म्हणाला, देशातील मुसलमान दहशतवाद्यांमुळेच संकटात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफझल संसदेवरील हल्ल्यात सहभागी होता. 13 डिसेंबरनंतर दोनच दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. पाच दिवसांनंतर त्याने प्रसारमाध्यमांपुढे हल्ल्यातील आपली भूमिका कबूल केली होती.

प्रश्न : संसदेवरील हल्लेखोर कोण होते?
अफझल : बेसिकली जे पाच लोक संसदेत घुसले होते, ते पाचही लोक पाकिस्तानी होते. त्यांचा प्रमुख होता मोहंमद. त्याचे इतर सहकारी होते हम्जा, हैदर, राणा आणि राजा. लोकसभेतील खासदार आणि पूर्ण राजकीय नेतृत्व संपवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. हे त्यांनी मला पहिल्या दिवशी सांगितले होते.
प्रश्न : त्यांना कोण मदत करत होते आणि पाठीशी कोण होते?
उत्तर : मी करत होतो आणि मला तेच लोक मदत करत होते. पडद्याआडून त्यांचा प्रमुख गाझीबाबा मदत करत होता. तो पाकिस्तानातील आहे. त्याचा प्रमुख होता जम्मू-काश्मीरचा. गाझीबाबाच्या मागे जैश आणि त्यांची पूर्ण व्यवस्था होती. त्यांचा लीडर तोच तर आहे. पाकिस्तानात मौलाना मसूद आहे.
प्रश्न : पूर्ण ऑपरेशनची माहिती पहिल्यांदा तुम्हाला केव्हा मिळाली?
उत्तर : मी मोहंमदला एक-दीड महिन्यापूर्वी घेऊन आलो होतो. तेव्हा त्याचे काही टार्गेट नव्हते. त्याने आधी दिल्ली असेंब्ली आणि दूतावासाची रेकी केली. वास्तविक, मी जेव्हा दुस-यांदा श्रीनगरला गेलो तेव्हा गाझी भेटला. त्याने मला सांगितले की, मोहंमदला टार्गेट दिले आहे. टार्गेट सांगितले नाही. मला सांगितले की, मोहंमदला सांगा की, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. मी येऊन मोहंमदला विचारले तेव्हा त्याने सांगितले की, लवकरच संसदेवर हल्ला करायचा आहे. हल्ल्यात सहभागी इतर चार जणांना मी स्वत:च घेऊन आलो होतो.
प्रश्न : टार्गेट काय आहे हे त्यांना आधीच माहीत होते का?
उत्तर : होय. त्यांना माहीत होते. चौघेही पंजाबी बोलत होते. ते नेमके कुठले रहिवासी होते हे मला माहीत नाही. पाचही जणांनी हल्ल्यापूर्वी एक दिवस पाकिस्तानात फोन केला होता. मोहंमद तर नेहमीच फोन करत असे आणि राजा व राणा माझ्यासमोर त्यांच्या आई-वडिलांशी बोलले होते. मोहंमद नेहमी चॅट करत असे. पाकिस्तान व अरब अमिरातीशीही.
प्रश्न : गाझीशी कंधारबद्दल काय बोलणे झाले होते?
उत्तर : त्याने सांगितले की, मी विमान अपहरणात सामील होतो. यात पाच जण सहभागी होते. एकाचे नाव इब्राहिम होते.
प्रश्न : तुम्ही कधी ट्रेनिंग घेतली का?
उत्तर : होय. मी पाकिस्तानात ट्रेनिंग घेतली. जम्मू-काश्मीरला गेलो होतो 1990 मध्ये. तेथे 15 दिवस थांबून पाकिस्तानच्या निवृत्त आर्मी अधिका-याकडून प्रशिक्षण घेतले. नंतर मी काश्मीरमध्ये 20 दिवस थांबलो. तेथे तर पूर्ण कारवाया होताना पाहिल्या. कसलेही स्वातंत्र्ययुद्ध नव्हते. त्यामागे कसला तर्कही नव्हता. वर हाणामारी. नंतर मी काश्मीर सोडून येथे (दिल्लीत) येऊन थांबलो. ते तेथे पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होते.
प्रश्न : त्यांना काय करायचे होते आणि तुम्ही का सोबत गेलात?
उत्तर : त्यांचा उद्देश पैसे कमावणे आहे असे वाटत होते. अनेक गोष्टी होत्या. मी कसे सांगू की कशासाठी लढत होतो. काही प्रेरणा होती. पैशांचीही भानगड होती. माझा थोडा इतिहासही तसाच होता. छळ होत होता. मला तर असे वाटते की, काश्मीरच्या नावाखाली जो दहशतवाद सुरू आहे त्यामुळे भारतातील मुसलमानांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आमच्यामुळे त्यांना भारतात त्रास होत आहे.
प्रश्न : गाझीबाबाशी केव्हा भेट झाली?
उत्तर : मी सुमारे सहा महिन्यांपूर्वी भेटलो. बेसिकली मिस्टर तारिक या समन्वयकाला आठ महिन्यांपूर्वी भेटलो. गाझीबाबा म्हणतो की, जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही तोवर गप्प बसायचे नाही. तारिक फक्त कोऑर्डिनेटर होता. तो बाबा आणि जैशसाठी काम करतो. काश्मीरमध्येच त्याचे चार कँप सुरू आहेत. काश्मीरच्या खो-यात. चार कँप मला माहीत आहेत. त्यातील एक पहलगाममध्ये होता.