आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशीसंबंधी प्रश्नांना उत्तरे नाहीत; अफझलच्या खुलाशामुळे अखंडतेला धोका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसद हल्लाप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेला दहशतवादी अफझल गुरूचा तुरुंगावास तसेच फाशीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यास तुरुंग प्रशासनाने स्पष्ट नकार दिला आहे. या प्रश्नांमुळे देशाची अखंडता व एकता धोक्यात येऊ शकते. तसेच शेजारी देशांशी संबंध तसेच आर्थिक, वैज्ञानिक हितांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे.
लखनऊच्या आरटीआय कार्यकर्ता उर्वशी शर्माने तुरंग विभागाला पत्र पाठवून 12 प्रश्न विचारले होते. त्यात त्यांनी अफझल गुरुच्या फाशीबाबत विचारणा केली होती. तिहार कारागृहात अफझल गुरूला 9 फेब्रुवारीरोजी फाशी देण्यात आली होती. अफझलला फाशीनंतर कुठे व किती वाजता दफन करण्यात आले? त्याची दफन प्रक्रिया कशी होती आदी माहिती तिने मागितली होती. मात्र, या प्रश्नांची उत्तरे देणे संवेदनशील असल्याने त्यामुळे भावना भडकू शकतात, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे.
..तर अनेक तथ्य समोर येतील : उर्वशीने म्हटले की, या प्रश्नांची उत्तरे दिली असती तर अनेक तथ्ये समोर आली असती. त्यामुळे मानवाधिकाराची चर्चा करणार्‍यांनाही उत्तर मिळाले असते. अफझलची दया याचिका फेटाळली जाणे व इतर संबंधित पत्रव्यवहार सार्वजनिक का केला जात नाही? आपण याबाबत फेरयाचिकेचा विचार करत आहोत.

आरटीआयअंतर्गत प्रमुख प्रश्न
> अफझल तुरुंगात असताना त्याच्यावर तसेच त्याच्या फाशीवर किती खर्च झाला?
> त्याला फाशी कधी, केव्हा आणि किती वाजता द्यायची याचा अंतिम निर्णय कुणी घेतला?
> अफझलचा अंतिम वैद्यकीय अहवाल काय होता?
> फाशी देणाºया जल्लादाचे नाव काय?
> मृतदेह दफन केला त्या वेळी कोण कोण उपस्थित होते? त्याची छायाचित्रे असतील तर तीही द्यावीत.