आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफझलने पाकिस्तानी दहशतवाद्यांना दिल्लीत आसरा दिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अफझल गुरू संसदेच्या पाच हल्लेखोरांमध्ये सहभागी नव्हता. पण त्याचा गुन्हा त्यापेक्षाही अधिक मोठा होता. अफझलने पाचही पाकिस्तानी दहशतवाद्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली होती. इतर आवश्यक ती सर्व व्यवस्थाही केली होती. संसदेत घुसखोरी करेपर्यंत दहशतवादी टोळक्याचा म्होरक्या मोहंमद मोबाइल फोनवरून अफझलच्या संपर्कात होता.

वास्तविक अफझलने सन 2001 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी गाझीबाबाच्या सांगण्यावरून दिल्लीत एक सुरक्षित ठिकाण तयार करून ठेवले होते. आपले नातेवाईक शौकत व गिलानींनाही त्यात सामील करून घेतले. ऑक्टोबर 2001 मध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोहंमदला काश्मीरहून दिल्लीत आणले. मुखर्जी नगरातील ख्रिश्चन कॉलनीत त्याला घर दिले. नंतर नोव्हेंबरमध्ये राजा, हैदर, राणा आणि हमजा यांना दिल्लीत थांबवण्यात आले. संसदेची रेकी करण्यासाठी यामाहा मोटारसायकल खरेदी केली. याशिवाय पाच मोबाइल, सहा सिमकार्ड खरेदी केले. किंगवे स्वॅपमधून पोलिसांचे तीन युनिफॉर्म खरेदी केले. आयआयडी बॉम्ब बनवण्यासाठी सामग्री खरेदी केली. संसदेचे बोगस स्टिकर, ओळखपत्र बनवले. 11 डिसेंबर रोजी करोलबाग येथून पांढ-या रंगाची अ‍ॅम्बेसेडर कार खरेदी केली.

लॅपटॉप व 10 लाख रोख रकमेसह अटक : हल्ल्याच्या दिवशी सर्व दहशतवादी गांधी विहारच्या घरात जमले. मोहंमदने अफझलला दहा लाख रुपये आणि लॅपटॉप दिला. पैसे स्वत:च ठेवून घे आणि लॅपटॉप गाझीबाबाला दे असे त्याला सांगितले.हल्ल्यानंतर तत्काळ अफझल आपला नातेवाईक शौकतसमवेत ट्रकमध्ये बसून पैसे व लॅपटॉप घेऊन श्रीनगरला पळाला. श्रीनगरमध्ये दोघेही ट्रकमध्ये 10 लाख रुपये व लॅपटॉपसह पकडले गेले.