आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीबीएस सोडून अफझल दहशतवादी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर. सोपोर जिल्ह्यातील आबगाह गावात जन्मलेला अफझल लहानपणापासूनच चाणाक्ष होता. 1986 मध्ये तो दहावी उत्तीर्ण झाला. बारावीनंतर त्याने एमबीबीएसला प्रवेश घेतला, पण 1990 मध्ये सगळे चित्र बदलले. एमबीबीएसच्या तिस-या वर्षांत असताना दहशतवाद्यांच्या संपर्कात आला. जेकेएलएफमध्ये दाखल झाला. पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी प्रशिक्षण घेतले. सहका-यांशी मतभेदानंतर दिल्लीत आला. दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. बँक ऑफ अमेरिकेत नोकरी केली. दिल्लीत 7 वर्षे राहून 1998 मध्ये काश्मीरला परतला. 2000 मध्ये टास्क फोर्सने त्याला अटक केली.