आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआग्रा- संसदेवर हल्ल्याचा मुख्य सुत्रधार अफझल गुरुला फाशी दिल्यानंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) वातावरण गरम झाले आहे. विद्यापीठात सलग दुस-या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. तसेच त्यांनी अफझल गुरुला 'शहीद'चा दर्जा देत साध्वी प्रज्ञासिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशी देण्याची मागणी केली.
आंदोलनात सहभागी झालेले बहुतांश विद्यार्थी कश्मिरी होते. त्यांच्या हातात पोस्टर आणि बॅनर होते. यात ‘We are all Afzal’ आणि ‘Hang me to India, You killed one Afzal & gave birth to hundred Afzal’ असे लिहले होते. या विद्यार्थ्यांनी सांगितले की, साध्वी प्रज्ञासिंग आणि नरेंद्र मोदी यांना फाशी का दिली जात नाही?. प्रज्ञासिंगवर दहशतवादी कारवाया सहभागी होण्याचे तर, मोदीवर गुजरातमधील दंगलीचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांना फाशी देण्यात यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.