Home »National »Delhi» Afzal Guru's Dead Body Sournder To Family - Wife Tabssum

पार्थिव कुटुंबाकडे सोपवणार, अफझल गुरूची पत्नी तबस्सुमचा दावा

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 18, 2013, 08:30 AM IST

  • पार्थिव कुटुंबाकडे सोपवणार, अफझल गुरूची पत्नी तबस्सुमचा दावा

नवी दिल्ली - संसद हल्लाप्रकरणी फाशी दिलेला आरोपी अफझल गुरू याचे पार्थिव कुटुंबाकडे सोपवण्यास केंद्र सरकार राजी झाले असल्याचा दावा अफझलची पत्नी तबस्सुमने केला आहे. तशी शिफारस जम्मू-काश्मीर सरकारने केंद्राला केली असून सरकार यावर गांभीर्याने विचार करत असल्याचे गृह मंत्रालयाचे प्रवक्ते कुलदीपसिंह धतवालिया यांनी म्हटले आहे. याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग घेऊ शकतील, असे गृहमंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
या संदर्भात गुप्तचर विभागाचा सल्ला घेतल्यानंतर काही निर्णय होऊ शकेल, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या दहा जिल्ह्यांत शनिवारी संचारबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर दंगलीत तिघांचा मृत्यू झाला असून अनेक भागांत दगडफेकीचे प्रकार सुरू आहेत.

Next Article

Recommended