आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फाशीच्या दीड तासापूर्वी अफझलने लिहले होते पत्नीला पत्र, वाचा व पाहा जसेच्या तसे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू/नवी दिल्ली- संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड अफझल गुरुला 9 फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली. अफझलला सकाळी 8 वाजता फाशी देण्यात आले तरी त्याने त्याचसकाळी 6.25 मिनिटांनी आपल्या पत्नीला शेवटचे पत्र लिहले होते. उर्दू भाषेतून दहा ओळीचे पत्र त्याने आपली पत्नीच्या नावाने लिहले होते. या पत्रात त्याने अल्लाचे आभार मानले होते. त्यात त्याने म्हटले की, महत्त्वाच्या व उच्च कामासाठी मला निवडले त्याबाबत अल्लाचे आभार.

अफझलने आपल्या परिवाराला आव्हान केले आहे की, माझ्या फाशीचे दु:ख करत बसू नका. उलट फाशीचा सन्मान करा. अफझलने या पत्रावर 09-02-2013 अशी तारीख लिहली आहे तसेच त्यावर 6.25 इतकी वेळ टाकली आहे.

अफझलने पत्रात परिवारासाठी कोणताही खासगी संदेश दिला नाही उलट सत्य आणि न्यायाची गोष्ट केली आहे. अफझलने लिहले आहे की, 'अल्लाचे लाख-लाख आभार मला या मोठ्या कामासाठी निवडले. जो कोणी असे मानत असेल त्याला माझ्या शुभेच्छा. आम्ही सर्व लोक सत्य आणि न्यायासाठी लढत राहिलो आणि आमचा शेवटही सत्य आणि न्यायाच्या मार्गानेच व्हायला हवा. माझ्या परिवाराला माझी विनंती आहे की माझ्या फाशीचे दु:ख करीत बसण्याऐवजी अल्लाने मला महत्त्वाच्या कामासाठी निवडले त्यासाठी आभार मानले पाहिजेत. अल्ला हाच तुमचा सगळ्यात मोठा रक्षक आणि मदतनीस आहे.

अफझलच्या पत्रातील अर्थ काय आहे असे जेव्हा अफझलचा नातेवाईक यासिनला विचारले तेव्हा तो म्हणाला, 'हे काश्मीरच्या लोकांवर अवलंबून आहे की, ते याचा अर्थ कसा काढतात. दुसरीकडे, हुर्रियत नेता मोहम्मद अशरफ सहराई यांनी अफझलच्या पत्रातून त्याचे संघर्षपूर्ण जीवन व वैचारिक पातळी लक्षात येते, असे म्हटले आहे. सहराईच्या म्हणण्यानुसार, या पत्रातून स्पष्ट होते की, अफझलला फाशीवर चढण्यास काहीही दु:ख व शल्य वाटले नाही. उलट पश्चातापापेक्षा आनंद अधिक वाटलेला दिसतो. फाशीमुळे तो अधिक आनंदी झाला असेल. अफझलने काश्मीरींना संदेश दिला आहे की, सत्यासाठी लढत राहा.

(वरील छायाचित्रात पाहा अफझलचे शेवटचे पत्र )

पत्रातील आशय काय आहे, पाहण्यासाठी पुढे क्लिक करा....