आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफजल खान कबर परिसरात धर्मशाळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबर परिसरातील धर्मशाळा वाद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला नोटीस बजावली आहे. अफजल खानच्या कबरीच्या परिसरातील धर्मशाळा चालविणा-या हजरत मोहम्मद अब्दुल खान ट्रस्टच्या याचिकेवरून न्या. डी. के. जैन आणि न्या. मदन लोकूर यांच्या खंडपीठाने ही नोटीस बजावली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 आठवड्यांनी होईल. ट्रस्टने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. भाजप नेत्याच्या याचिकेवरून उच्च न्यायालयाने ही धर्मशाळा बेकायदेशीर असेल तर ती पाडून टाकण्याचे आदेश सरकारला दिले होते, परंतु धर्मशाळेला ही जागा केंद्र सरकारने भाडेतत्त्वावर दिल्याने त्यावरील बांधकाम बेकायदेशीर असू शकत नाही, असे ट्रस्टचे म्हणणे आहे. न्यायालयाने हा निकाल देताना आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली नव्हती, असा दावा ट्रस्टकडून करण्यात आला आहे. धर्मशाळेची जागा केंद्र सरकारने भाडेपट्टीवर दिल्याची माहिती न्यायालयाला दिली नव्हती. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या विरोधात निर्णय दिल्याचे या ट्रस्टचे म्हणणे आहे.'