आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Afzal 's Dead Body Demand Constitutional Right : Kashmir Pandit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफजलच्या मृतदेहाची मागणी हा घटनात्मक हक्क : काश्मिरी पंडित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


श्रीनगर - संसद हल्ला प्रकरणातील फासावर लटकवलेला दहशतवादी अफजल गुरूचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना परत करण्यात यावा. हा त्यांचा घटनात्मक हक्क आहे, अशी मागणी काश्मिरी पंडितांच्या संघटनेने केली आहे. दरम्यान, फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सने अफजलच्या फाशीविरोधात पुकारलेल्या संपामुळे सलग नवव्या दिवशी काश्मिरातील जनजीवन ठप्प होते. अफजलचा मृतदेह त्याच्या कायदेशीर वारसांच्या हवाली करण्यात यावा, अशी विनंती काश्मिरी पंडित संघर्ष समितीने केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान, हुरियतच्या सय्यद अली शाह गिलानी यांच्या गटाने संप पुकारला असून रविवारी दुकाने, उद्योग,सार्वजनिक वाहतूकही बंद होती. 9 फेब्रुवारी रोजी हुरियतने सात दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील संचारबंदी मागे घेताच संपाचा कालावधी 2 दिवस वाढवला.