आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपात पुन्हा कल्याण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह पुन्हा भाजपच्या तंबूत परतले आहे. त्यांच्या जनक्रांती पार्टीचे (राष्‍ट्र वादी) भाजपमध्ये औपचारिक विलीनीकरण करण्यात आले. मात्र, पक्षांतरबंदी कायद्यामुळे कल्याण सिंह यांनी भाजपचे सदस्यत्व सध्या स्वीकारले नाही.

कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंग यांनी लखनऊमध्ये आयोजित सभेत पक्षाच्या विलीनीकरणाची घोषणा केली. या वेळी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, मुख्तार अब्बास नकवी, राजनाथ सिंह, विनय कटियार, उमा भारती, कलराज मिश्र आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

सभेनंतर कल्याण सिंह पत्रकारांना म्हणाले की, मी सध्या भाजपचे सदस्यत्व स्वीकारले नाही. सदस्यत्व स्वीकारण्याआधी मला पहिल्यांदा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे पोटनिवडणूक होईल. 2014 ची निवडणूक तोंडावर आली असताना सध्या सदस्यत्व सोडणे अनावश्यक आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जयपूरमध्ये संघ व भाजपबाबत केलेल्या वक्तव्यावर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजप मुस्लिमविरोधी नसून पक्षाचा सर्वांसाठी समान न्याय आहे.