आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओवेसी पुन्हा कोठडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिलाबाद -,चौकशीला सहकार्य न करणारे आंध्र प्रदेशातील एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. देशद्रोह आणि चिथावणीखोर भाषण दिल्याच्या आरोपाखाली ते 12 जानेवारीपासून पोलिस कोठडीत होते. चार दिवसांच्या चौकशीनंतर पोलिसांनी ओवेसी यांना बुधवारी सकाळी न्यायदंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आले. ‘ओवेसींनी चौकशीस सहकार्य केले नाही, ’ अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने न्यायालयास सांगितली. भडक आणि चिथावणीखोर भाषण केल्याचा पुरावा म्हणून पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या सीडीतील आपला आवाज नसल्याचा दावा ओवेसींनी न्यायालयात केला.

ओवेसींच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. परंतु न्यायालय त्याबाबत नंतर सुनावणी करणार आहे. वादग्रस्त भाषणप्रकरणी ओवेसींविरोधात 24 डिसेंबररोजी आदिलाबाद, निजामाबादसह इतर ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.