आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation Against Hindi In Tamilnadu : Opposed Hindi Sign Board

तामिळनाडूत हिंदी विरोधी आंदोलन ; साइनबोर्डलाही स्थानिकांचा विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदुराई - 1960 च्या दशकात हिंदीविरोधी आंदोलनाचा साक्षीदार ठरलेल्या तामिळनाडूत हिंदी भाषेचा द्वेष अद्यापही कमी झाला नसल्याचे उघड झाले आहे. मदुराई जिल्हा प्रशासनाला तामिळ व इंग्रजीसोबत हिंदी भाषेत साइनबोर्ड बसवण्याचा आदेश मागे घेणे भाग पडले आहे. स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केल्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे.

पर्यटकांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले साइनबोर्ड लोकांच्या विरोधामुळे काढून टाकले जात आहेत, असे जिल्हाधिकारी अंशुल मिश्रा यांनी सांगितले. तामिळ बंधू-भगिनींच्या भावनांचा आदर करत तीन भाषांत फलक बसवण्याचा तसेच त्यावरील हिंदी भाषेच्या सक्तीचा आदेश मागे घेतला आहे. मी इथे लोकांची सेवा करण्यासाठी आलो असून माझ्या मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी नाही, असे मिश्रा यांनी फेसबुकवर सांगितले. हिंदीतील साइनबोर्डच्या विरोधात तामिळ देसा पोथू उडामाई काटची संघटनेने या महिन्यात आंदोलन केले होते. पर्यटन उद्योगातील संघटना व नागरिकांनी मिश्रा यांना पाठिंबा दिला होता. हिंदीचा विरोध करणा-या ंमुळे राज्याचे भले होणार नाही. जास्त भाषा माहीत असणा-यांना नोकरीच्या संधी मिळतात. शहराचा तो चांगला गाइड होऊ शकतो, असे यात्रा कंपनीचे वेणुगोपाल यांनी सांगितले.

द्रमुकची चळवळ
हिंदी साइनबोर्डविरोधात फेसबुकवर मोहीम चालवण्यात आली होती. 1965 मध्ये द्रमुक पक्षाने हिंदीविरोधी चळवळ चालवली. यानंतर राज्यात मत विभाजन झाले. 1967 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकने कॉँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली. त्या वेळपासून कॉँग्रेस तामिळनाडूत सत्तेपासून कोसो दूर फेकली गेली आहे.