आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Agitation Jaitapur Issue Before The French President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सच्या राष्‍ट्राध्यक्षांसमोर जैतापूरप्रकरणी निदर्शने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उभय देशांतील द्विपक्षीय तसेच विविध पातळीवरील संबंध बळकट करण्यासाठी आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ ओलांद यांना गुरुवारी जैतापूर प्रकल्पावरून संतापाला सामोरे जावे लागले. प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कोणतीही योग्य उपाययोजना करण्यात आलेली नाही. फुकुशिमाची पुनरावृत्ती होऊ शकते, असा आरोप करत निदर्शकांनी या अणुऊर्जा प्रकल्पाला या वेळी कडाडून विरोध केला.

महाराष्ट्रातील जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीला विरोध करण्यासाठी गुरुवारी आयोजित आंदोलनात ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन्स आणि विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जैतापूरची जमीन हापूस आंब्याच्या लागवडीची जमीन आहे, परंतु प्रकल्पाच्या निर्मितीमुळे स्थानिक शेतक-यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. दुसरा फुकुशिमा होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली. प्रकल्पाची निर्मिती करताना सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, त्याची माहिती जाहीर केली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली.

6 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार
भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंधाच्या नवीन पर्वाला गुरुवारी सुरुवात झाली. उभय देशांत आखूड पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणा-या क्षेपणास्त्राच्या प्रकल्पासंबंधीचा महत्त्वपूर्ण करार झाला. सुमारे 6 अब्ज डॉलर्सच्या या करारासह विविध पातळीवरील सहकार्य करण्यास दोन्ही देशांत सहमती झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ ओलांद आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही माहिती जाहीर करण्यात आली. दोन्ही देशांत 10 अब्ज डॉलर्सच्या लढाऊ विमानाचा करारही अंतिम टप्प्यात आला आहे.

वैद्यकीय सेवेसाठी 7 विमाने
वैद्यकीय पातळीवर फ्रान्सने भारताला मदतीचा हात दिला आहे. आणीबाणीच्या काळात वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सात विमाने भारताला मिळणार आहेत.
प्रकल्प लवकरच
आम्ही जैतापूर प्रकल्पाचा बैठकीत आढावा घेतला. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने उभय देशांत सहकार्य केले जात आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग.
व्यापारी सहकार्य
दोन्ही देशांत व्यापारविषयक सहकार्यावर सहमती झाली आहे. स्पर्धात्मक पातळीवर आम्ही एकत्र येऊन काम करण्यास तयार आहोत. व्यापारी तत्त्वाला त्यात प्राधान्य असेल.
राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ ओलांद