आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली : परेडने वेधले परदेशी पाहुण्यांचे लक्ष, \'बिग बी\'ची हजेरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देश आज 64 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 'अमर जवान ज्योती'वर शहीदा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
'अमर जवान ज्योती' वर श्रद्धांजली वाहून पंतप्रधान राजपथवरील मुख्य समारोपास्थळी पोहचले. तेथे त्यांचे संरक्षणमंत्री ए. के. एंटनी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तीन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी या समारंभासाठी या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे भूटानचे नरेश जिग्मे खेसर यांच्यासोबत हजर झाले. या पाहुण्यांचे स्वागत पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तीन्ही सेना दलाच्या प्रमुखांनी केले. या खास समारंभासाठी भारतातील प्रमुख नेत्यांसह देश-विदेशातील पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.
राजपथपासून 7 किलोमीटरवरील उंच आकाशात 80 किलोमीटर प्रती तास वेगाने वायुसेनेच्या एमआय 17 या हेलिकॉप्टरने उड्डाण करून समारंभाला प्रारंभ झाला. या विमानावर भारताचा तिरंगा आणि भूटानचा राष्ट्रीय ध्वज फडकत होता. त्यानंतर झालेल्या परेडमध्ये तीन्ही दलांनी आपली ताकद दाखविली. याचबरोबर 'डीआरडीओ'ने विकसित केलेल्या अग्नि-5 या क्षेपणास्त्राने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याची मारक क्षमता 5 हजार किलोमीटर इतकी आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि अर्जुन टॅंकचे परेडदरम्यान प्रदर्शन करुन देशाने ताकद दाखवून दिली. याचबरोबर पिनार मल्ची बॅरेल रॉकेट लॉन्चरने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याचबरोबर देशातील विविध राज्यांनी आपापली संस्कृती ओळख करून दिली. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाची विविधता दाखविली गेली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय सिनेमाची शंभर वर्षांचा इतिहास पाहुण्यासमोर ठेवला. यावेळी खास अशा कॉश्चूम घालून आलेल्या अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांचे लक्ष खेचले.