आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नि- 1 ची यशस्वी चाचणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूरू - भारताने शुक्रवारी अग्नि- 1 या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या बलसोर येथे व्हिलर आयलॅंडवर सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर सातशे किलोमीटरवर मारा करण्याची ताकद या क्षेपणास्त्रात असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. लक्ष अचूकपणे भेदणे, हे अग्नि-1 क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य आहे.
ही सराव चाचणी होती. हे क्षेपणास्त्र आपले लक्ष्य अचूकपणे भेदू शकते का, याची चाचणी संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) घेतली.
अग्नी-5 ची झेप, निम्मे जग टप्प्यात; आशिया,आफ्रिकेसह युरोप भारताच्या रेंजमध्ये