आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ai Staff Integration Process To Start In 45 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एअर इंडिया'मध्‍ये वेतन पुनर्रचना 45 दिवसांमध्‍ये सुरु होणारः अजित सिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍लीः एअर इंडियाच्‍या सर्व कर्मचा-यांची पदोन्‍नती, पगार, भत्त्यांची पुनर्रचना 45 दिवसांमध्‍ये सुरु होईल, अशी घोषणा नागरी विमान वाहतूकमंत्री अजित सिंग यांनी केली. या घोषणेनंतर त्‍यांनी सर्व संपकरी वैमानिकांना विनाशर्त कामावर परतण्‍याचे आवाहन केले. त्‍यानंतरच वैमानिकांच्‍या मागण्‍यांवर विचार होईल, असेही सिंग यांनी स्‍पष्‍ट केले.
एअर इ‍ंडिया आणि इंडियन एअरलाईन्‍स या दोन्‍ही सरकारी विमान वाहतूक कंपन्‍यांचे पाच वर्षांपुर्वी विलिनीकरण झाले होते. त्‍यानंतर एअर इंडिया ही एकच कंपनी अस्तित्त्वात राहीली. परंतु, दोन्‍ही कंपन्‍यांच्‍या कर्मचा-यांचे पगार, पदोन्‍नती, भत्ते, इत्‍यादींमध्‍ये समानता नव्‍हती. त्‍यामुळे आता एकात्मिक धोरण राबवून ही समानता आणण्‍यात येईल, असे सिंग म्‍हणाले. त्‍यांनी सांगितले की, अस्तित्त्व टीकवून ठेवण्‍यासाठी हे आवश्‍यक आहे. सरकार सध्‍या एअर इंडियाला 30 हजार कोटी रुपये देणार आहे. परंतु, यापुढे जनतेचा पैसा एअर इंडियाला मिळणार नाही, असे सिंग यांनी स्‍पष्‍ट केले. संपाबाबत ते म्‍हणाले, वैमानिकांनी विनाशर्त कामावर रुजू व्‍हावे. उच्‍च न्‍यायालयानेही संप बेकायदेशीर ठरविला आहे. आधी कामावर परतावे. त्‍यानंतर त्‍यांच्‍या सर्व मागण्‍यांचा आम्‍ही विचार करु.
एअर इंडिया, किंगफिशरमधील वादात जेट एअरवेजचा फायदा
एअर इंडियाच्या महाराजावर 454 कोटी सेवा कराचा बोजा
एअर इंडियाचे आणखी 30 वैमानिक बडतर्फ, संपाचा तिढा कायम