आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम्सची चार डॉक्टर दांपत्ये गरिबांच्या सेवेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर - येथे परस्परांचे शेजारी असलेल्या 40 रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया यावर्षी दिल्लीत झाल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून येथे रुग्णसेवेचा वसा घेऊन राबणा-या चार डॉक्टर दांपत्यांमुळे हे शक्य झाले आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ‘एम्स’मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर गरिबांची सेवा करण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांच्या नोक-यांचे प्रस्ताव नाकारले. त्यांचा संघर्ष सुरूच आहे. छत्तीसगडमधील 63 गावांमध्ये त्यांनी दिल्लीसारख्या अत्याधुनिक उपचारांची सोय केली आहे. 1996 मध्ये ही चारही डॉक्टर दांपत्ये या कल्पनेवर तत्काळ सहमत झाली. हा विचार डॉ. योगेश जैन यांचा होता. त्यावर त्यांची पत्नी रचना जैन, डॉ. रमन-अंजु कटारिया, डॉ. बिस्वरूप-माधवी चटर्जी आणि डॉ. अनुराग-माधुरी यांनी देशातील आरोग्य सुविधा नसलेल्या भागाचा शोध सुरू केला. तेथे जाऊन त्यांना रुग्णालय उघडायचे होते. त्यांचा हा विचार बिलासपूरचे कमिशनर मदनमोहन उपाध्याय यांना कळला. त्यांनी क्लिनिक सुरू करण्यासाठी बिलासपूरपासून 21 किलोमीटर अंतरावरील गनियारी येथे जागा दिली.

2 राज्यांतील रुग्ण - सुरुवातीला रुग्णालयात 44 खाटा होत्या. आज तेथे 13 डॉक्टर आहेत. अत्याधुनिक सोयी असलेले ऑपरेशन थिएटरही आहे. आता फक्त विलासपूरहूनच नव्हे, तर छत्तीसगडच्या चार आणि मध्य प्रदेशाच्या तीन जिल्ह्यांतील रुग्ण येथे येतात. टीमसोबत काम करणारे डॉ. सुशील यांनी सांगितले की, जवळपासच्या 6-7 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जितके रुग्ण येत नाहीत त्याहून दुप्पट रुग्ण त्यांच्याकडे येतात.