आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Air Chief Marshal Tyagi Was Given Bribe In Helicopter Deal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तर हेलिकॉप्‍टर खरेदीचा सौदाच रद्द करुः संरक्षणमंत्री एंटोनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 'अगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर' खरेदीप्रकरणी माजी वायुसेना प्रमुख एस. पी. त्‍यागी यांच्‍या नावावर लाच घेतल्‍याचा आरोप करण्‍यात आला आहे. याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्‍यात येत असून सीबीआयच्‍या अहवालानंतर कारवाई होईल, असे संरक्षणमंत्री ए. के. एंटोनी यांनी आज पत्रकार परिषदेमध्‍ये स्‍पष्‍ट केले. तर याप्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून इटालियन कंपनी असल्‍यामुळे चौकशीस विलंब झाला का, असा सवाल भाजपने केला आहे. एंटोनी यांनी भाजपच्‍या टीकेला प्रत्‍युत्तर देताना सांगितले की, चौकशीनंतर गैरव्‍यवहार आढळल्‍यास हा संपूर्ण सौदाच रद्द करु. तर त्‍यागी यांनी आरोप फेटाळले आहेत. करार झाला त्‍याच्‍या 3 वर्षांपूर्वीच निवृत्त झालो होतो, असे त्‍यागी यांनी सांगितले.

इटालीयन कंपनी फिनमेक्कानिका या संरक्षण कंपनीशी भारताने 2010मध्‍ये 12 अगस्टावेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. 3,600 कोटी रुपयांच्या या सौद्यात अमेरिकी कंपनी सिकरोस्कीला मागे टाकून अगस्टावेस्टलँडने हा सौदा खिशात घातला होता. प्रारंभी अर्थ मंत्रालय या सौद्यासाठी हो-नाही करत होते, मात्र नंतर तेही राजी झाले. संरक्षणविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत या सौद्याला मंजुरी देण्यात आली होती.

याप्रकरणी एस. पी. त्‍यागी यांना मध्‍यस्‍थांमार्फत लाच पोहोचविण्‍यात आली होती. या मध्‍यस्‍थांमध्‍ये ज्‍युली नावाच्‍या एका महिलेचेही नावा पुढे आले आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्‍्रेस'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. नेमकी किती लाच देण्‍यात आली, याची अद्याप माहिती नाही.