आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Air India Also Asked To Ground All Boeing Dreamliner

जगभरात \'बोईंग\'चे \'ड्रिमलायनर\' जमिनीवर, भारतातही उड्डाण होणार नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- जगातील आघाडीची विमान निर्मिती कंपनी 'बोईंग'च्‍या अद्ययावत 'ड्रिमलायनर' विमानांमध्‍ये तांत्रिक दोष आढळल्‍यानंतर आता जगभरात या विमानांची उड्डाणे थांबविण्‍यात येत आहेत. जपानपाठोपाठ आज भारतात या विमानांची उड्डाणे थांबविण्‍यात आली आहेत. ही विमाने उडविण्‍यात येऊ नये, असे आदेश नागरी विमान वाहतूक संचालनालयाने एअर इंडियाला दिले आहेत. त्‍यानंतर एअर इंडियाने आपल्‍या ताफ्यातील 6 ड्रिमलायनर विमानांचा वापर थांबविला. तसेच अमेरिकेनेही या विमानांचा वापर थांबविला आहे.

अमेरिकेच्‍या विमान वाहतूक संचालनालयाने देशातील सर्व विमान वाहतूक कंपन्‍यांना ड्रिमलायनरचा वापर थांबविण्‍याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेची युनाईटेड एअरलाईन्‍स याच कंपनीकडे 6 ड्रिमलायनर विमाने आहेत. या विमानांमध्‍ये बॅटरीत दोष असल्‍याचे जपानमध्‍ये आढळले होते. जपानच्‍या ऑल निप्‍पॉन एअरलाईन्‍सच्‍या विमानांमध्‍ये बॅटरीला आग लागण्‍याच्‍या दोन घटना घडल्‍या होत्‍या. त्‍यामुळे विमानांच्‍या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले होते. विमानांच्‍या बॅटरी सुरक्षित असल्‍याची खात्री पटत नाही, तोपर्यंत ही विमाने वापरण्‍यात येऊ नये, असे अमेरिकेच्‍या संचालनालयाने म्‍हटले आहे. अमेरिकेपाठोपाठ आता जगभरातील इतर देशही अशाच पद्धतीची पावले उचलू शकतात.