आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर इंडियाची अलार्मने फजिती; तब्बल 12 तास 122 प्रवाशांना भोगावा लागला ‘तुरुंगवास’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वैमानिकांच्या संपामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाची सोमवारी चुकीच्या अलार्ममुळे चांगलीच फजिती झाली. त्यामुळे त्याच्या एका विमानाला पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लॅँडिंग करावे लागले. तपासणीअंती विमानात कोणताही बिघाड आढळून आला नाही. मात्र त्यामुळे 122 प्रवाशांना निष्कारण तब्बल 12 तास ‘तुरुंगवास’ भोगावा लागला. दुपारी या प्रवाशांना विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले.
एअर इंडियाचे ए 319 हे विमान अबूधाबीहून दिल्लीला येत होते. विमानात 122 प्रवाशी आणि 8 विमान कर्मचारी होते. कॉकपीट पॅनलमध्ये अचानक अलार्म वाजला. त्यामुळे धोक्याचा लाल दिवा लागला. विमानाच्या हायड्रोलिक सिस्टिममध्ये बिघाडाचे ते संकेत होते. वैमानिकाने लगेचच पाकिस्तानी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून विमान उतरवू देण्याची परवानगी मागितली. पहाटे 3 वाजून 37 मिनिटांनी या विमानाला सिंध प्रांतातील नवाबशाह विमानतळावर उतरवण्याची परवानगी देण्यात आली.
विमानातील बिघाड दुरुस्ती आणि प्रवाशांना आणण्यासाठी ए 320 हे मदत आणि बचाव विमान पाठवण्यात आले. विमानासोबत गेलेल्या अभियंत्यांनी विमानाची तपासणी केली. विमानात कोणताही बिघाड नाही. कॉकपीट पॅनलमध्ये चुकीने अलार्म वाजल्याचे त्यांनी तपासणीअंती सांगितले. विमानातील प्रवाशांना विमानतळावरील लाउंज वापरण्यास परवानगी देण्यात आली मात्र वैमानिकाने स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मागणीवरूनच प्रवासी आणि कर्मचाºयांसाठी पाणी पाठवण्यात आले, असे पाकिस्तानी अधिकाºयांनी सांगितले.
इंधनासाठी पाकने दिले पैसे- इमर्जन्सी लॅँडिंग करणाºया विमानात इंधन भरण्यासाठी पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून भारतीय अधिकाºयांना पैसे घ्यावे लागले. परदेशात इंधन भरण्यासाठी अधिकाºयांकडे आंतरराष्ट्रीय कार्ड असते मात्र पाकिस्तानला जाताना भारतीय अधिकारी हे कार्ड सोबत न्यायला विसरले होते.