आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Air India To Begin Recruitment Of New Pilots Soon As Strike Issue Not Solved

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअर इंडियाकडून नवी वैमानिक भरती, संपक-यांना कायमची कवाडे बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वैमानिकांच्या संपाबाबत अत्यंत कठोर धोरण स्वीकारीत सरकारने आज हकालपट्टी करण्यात आलेल्या वैमानिकांसाठी एअर इंडियाची कवाडे कायमची बंद केली. वैमानिकांनी बिनशर्त कामावर रुजू व्हावे त्यांचे स्वागत आहे, असे आवाहन करून हकालपट्टी करण्यात आलेल्या वैमानिकांनी आता भरतीच्या वेळेस नव्याने अर्ज करावेत, अशा शब्दात हवाई वाहतूक मंत्री अजितसिंह यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
हवाई वाहतूक मंत्र्यांनी आज संपकरी वैमानिकांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, एअर इंडियामध्ये आमुलाग्र बदल सुचवणारा धर्माधिकारी अहवाल वैमानिक स्वीकारणार नसतील तर संपकरी वैमानिकांनी कामावर परत येऊनही उपयोग नाही.आमच्या दृष्टीने संप संपला आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्या 101 वैमानिकांनी आता नव्याने अर्ज करावेत.दरम्यान,वैमानिकांच्या संपाचा आज 30 वा दिवस होता. महिनाभरापासून सुरु असलेल्या संपाची कोंडी आजही फूटू शकली नाही. संपकरी वैमानिकांनी आज दिल्ली आणि मुंबईत मूक मोर्चा काढला. व्यावसायिक प्रगती , हकालपट्टी करण्यात आलेल्या 101 वैमानिकांची फेरनियुक्ती व संघटनेला पुन्हा मान्यता दया अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला.
वैमानिकांचा संप बेकायदा असल्याची सरकारची भूमिका असून उच्च न्यायालयानेही हा संप बेकायदा ठरवला आहे. संपाबाबत वैमानिकांनी नोटीसही दिली नव्हती असे सांगून संपकरी पुन्हा रुजू झाल्यास त्यांचे स्वागतच आहे परंतु त्याना विनाशर्त कामावर यावे लागेल असे सिंग यांनी स्पष्ट केले.

तीन नवीन विमाने
तीन नवीन बोइंग 787 विमाने या महिन्यात एअर इंडियाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाणांचाही विस्तार करण्यात येणार असून हाँगकाँग, ओसाका, टोरोंटो आणि सेउलकडे जाणारी विमाने काही आठवड्यात पु्न्हा पूवर्वत सुरु होणार आहेत. हाँगकाँसाठी एअरबस ए-139 विमान येत्या 1 जुलैपासून सुरु होईल. त्यानंतर ती सेऊल, ओसाका, क्वालालंपूर, मुंबई-लंडन मार्गावर 1 आॅगस्टपासून उड्डाणे सुरु करण्यात येणार आहे. आॅस्ट्रेलिया मार्गावरील उड्डाणे 1 सप्टेंबरपासून सुरू होतील, असे अजितसिंग म्हणाले.