आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहालजवळ विमानतळ

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - जगप्रसिद्ध ताज महालला भेट देण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची अडचण लक्षात घेऊन आग्रा आणि मथुरेच्या दरम्यान लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. खासगी- सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) बांधण्यात येणार्‍या या विमानतळाचे काम 2017पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे पर्यटन विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आग्रा आणि मथुरेच्या जिल्हाधिकार्‍यांनी या विमानळासाठी चार ठिकाणांची पाहणी केली आहे. प्रस्तावित विमानतळासाठी सल्लागार समिती आणि विकास व व्यवस्थापन समितीची स्थापनाही करण्यात आली आहे, असेही हा प्रवक्ता म्हणाला.