आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बालासोर - जमिनीवरून आकाशात मारा करू शकणाऱ्या 'आकाश' क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. चंदिपूरजवळील 'इंटिग्रेटेड टेस्ट रेंज' (आयटीआर) तळावरून ही चाचणी घेण्यात आली. वायुसेनेसाठी विकसित केलेल्या 'आकाश'च्या आवृत्तीची ही चाचणी होती. आयटीआरवरुन दोन क्षेपणास्त्रे सोडण्यात आली. त्यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
याचप्रकारच्या चाचण्या यापूर्वी 24, 26 आणि 28 मे रोजी घेण्यात आल्या होत्या. आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा 2008 मध्येच संरक्षण दलांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची मारकक्षमता 25 किलोमीटरपर्यंत आहे. तर 60 किलोंपर्यंची स्फोटके वाहून नेता येऊ शकतात. 'आकाश' हे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. विकसित तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता पडताळून पाहण्यासाठी आजची चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी एका मानवरहित विमानाचा लक्ष्य म्हणून वापर करण्यात आला होता. 'राजेंद्र राडार'मुळे 'आकाश'ला लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य आहे. तसेच एकाचवेळी अनेक लक्ष्यांनाही भेदणे शक्य झाले आहे. 'राजेंद्र राडार' एकाचवेळी 64 लक्ष्यांवर नजर ठेवणे तसेच 12 क्षेपणास्त्रांवर नियंत्रण ठेऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.