आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil Gogoi Alleges Reporter And A Youth Congress Leader

गुवाहाटीः अल्‍पवयीन मुलीच्‍या विनयभंगप्रकरणी पत्रकार, कॉंग्रेस नेत्‍यावर आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटीः गुवाहाटीमध्‍ये एका अल्‍पवयीन मुलीचा विनयभंग करण्‍याचा प्रकार घडला. या प्रकरणातील संशयित आरोपींमध्‍ये एका स्‍थानिक वृत्त वाहिनीचा पत्रकार आणि युवा कॉंग्रेसच्‍या एका नेत्‍याचा समावेश असल्‍याचा आरोप टीम अण्‍णाचे सदस्‍य अखिल गोगोई यांनी केला आहे. दरम्‍यान, विनयभंग प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्‍यासाठी महिला आयोगाचे पथक आज गुवाहाटीमध्‍ये दाखल होणार आहे.
गुवाहाटीत एका पबजवळ 20 जणांनी अल्‍पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केला. हा प्रकार काल उघडकीस आला. या घटनेत 'न्‍यूजलाईव्‍ह' या वृत्तवाहिनीचा वार्ताहर गौरव ज्‍योति याचा समावेश होता, असा आरोप अखिल गोगोई यांनी केला आहे. हा दावा सिद्ध करण्‍यासाठी एका व्हिडिओचा पुरावा असल्‍याचे गोगोई यांनी सांगितले.
गोगोई यांनी पत्रकारावर आरोप केल्‍यानंतर गुवाहाटीतल प्रसार माध्‍यमांनी गोगोई यांना पुरावा सादर करण्‍याची मागणी केली आहे. गोगोई यांचे आरोप पत्रकार संघटनेने फेटाळले आहेत.
गुवाहाटीत अल्पवयीन मुलीला मारहाण करून केले बेअब्रू!
‘त्या’ मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याचे निष्पन्न
अल्पवयीन मुलीवर सलग 20 दिवस सामुहीक बलात्कार