आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आझम खानचा राजीनामा अखिलेश यादवांनी फेटाळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - अलाहाबादमधील कुंभ मेळ्याला आलेल्या 36 भाविकांचा रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाकुंभमेळ्याच्या संयोजन समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिलेल्या आझम खान यांचा राजीनामा आज फेटाळून लावण्यात आला. यूपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हा निर्णय फेटाळला.

रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत आझम खान यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यादव यांच्याकडे पाठविला होता. मात्र, खान यांचा राजीनामा फेटाळल्याचे आज मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. हा कुंभ मेळा 10 मार्चपर्यंत चालणार आहे.