आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांनी अखिलेश यांचा अलाहाबादेत दौरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- अलाहाबादमधील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव घटनास्थली पोहोचले. मंगळवारी त्यांनी मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. त्याचबरोबर नातेवाइकांना 5 वरून 7 लाख रुपये मदत निधी देण्याचे जाहीर केले. त्यांनी जखमींचीही भेट घेतली. कुंभसारख्या पवित्र ठिकाणी राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

अलाहाबादच्या रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला होता. महाकुंभमध्ये ज्या पवित्र भावनेने लोक सहभागी होत आहेत ती भावना कायम राहिली पाहिजे, असे मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. त्या अगोदर राज्यपाल बीएल जोशी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. काही चुकीमुळे ही घटना घडली आहे. त्याची चौकशी केली जाईल.

फोटोग्राफरविरोधात गुन्हा दाखल
कुंभच्या परिसरात अतिशय धोकादायक पद्धतीने उड्डाण केल्याबद्दल पोलिसांनी परदेशी फोटोग्राफर आणि
हेलिकॉप्टर कंपनीवर गुन्हा दाखल केला. रविवारी मौनी अमावस्येच्या दिवशी हेलिकॉप्टर अतिशय खालून उडाले होते.