आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhilesh Yadav Gives New Boost In Samajwadi Party

विकास हवा, भ्रष्‍टाचार हटवाः अखिलेश यादव यांचा नवा नारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझमगढः समाजवादी सत्तेवर आल्‍यास मुलायमसिंह यादव हेच मुख्‍यमंत्री होतील, असे पक्षाचे प्रदेश अध्‍यक्ष तसेच मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यांनी आज स्‍पष्‍ट केले आहे. पक्षाचे सर्व खासदार आणि आमदारांचे यावर एकमत असल्‍याचे अखिलेश यादव यांनी सांगितले.
समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी यंदाच्‍या निवडणुकीची सर्व सुत्रे अखिलेश यांच्‍याकडे सो‍पविली आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत अखिलेश यांच्‍या रुपाने एक नवे नेतृत्त्व उत्तर प्रदेशच्‍या क्षितिजावर उदयास आले आहे. विशेष म्‍हणजे ते एक नवा विचार आणि नवी भूमिका घेऊन पुढे आले आहेत. त्‍यामुळे जनतेमध्‍ये त्‍यांच्‍याबाबत प्रचंड उत्‍सुकता आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या सभांना प्रतिसादही वाढत आहे.
प्रचारादरम्‍यान सपाने एक वेगळीची रणनिती आखल्‍याचे दिसून येत आहे. अखिलेश यादव हे प्रचारामध्‍ये बाबरी मशीद घटनेबाबत एकही शब्‍द काढत नाही. 1990मध्‍ये कारसेवकांवर गोळीबार करण्‍याचा आदेशाने मुलायमसिंह यादव यांना मौलाना मुलायमसिंह बनविले. परंतु, अखिलेश हे राम मंदिराचे नावही काढत नाहीत. तरीही हनुमन गढीचे महंत त्‍यांना फेटा घालतात. अखिलेशकडून निराशा मिळणार नाही, असेही ते सांगतात.
भ्रष्‍टाचार आणि विकास, हे दोन मुद्दे अखिलेश यांनी प्रामुख्‍याने मांडले आहेत. मायावतींचे सरकार भ्रष्‍ट असून ते या सरकारपासून जनतेला मुक्त केले पाहिजे. निवडणू आयोगाने मायावतींचे पुतळे डब्बाबंद केले आहेत. आता मायावतींना भ्रष्‍टाचारासाठी बंद करणे तुमच्‍या हातात आहे, असे आवाहन अखिलेश मतदारांना करतात. परंतु, तुमचा पक्ष सुशासन आणि विकास देईल, याची खात्री काय, असा प्रश्‍न त्‍यांना विचारण्‍यात आला. त्‍यावर ते म्‍हणतात, आमच्‍यासमोर हे एक मोठे आव्‍हान आहे. मतदारांमध्‍ये तरुणांची संख्‍या फार मोठी आहे. त्‍यांच्‍या परीक्षेत आम्‍हाला खरे उतरायचे आहे.
अखिलेश यांच्‍याकडे प्रदेश अध्‍यक्ष म्‍हणून दोन वर्षांपुर्वी जबाबदारी देण्‍यात आली. आज पक्षामध्‍ये त्‍यांचे नेतृत्त्व मान्‍य करण्‍यात आले आहे. विरोध करणारे नेते पक्षाबाहेर आहेत. अनेक महत्त्वाचे निर्णय अखिलेश यांनी घेतले आहेत. त्‍यामुळे आता या निवडणुकीत त्यांच्‍या पक्षाला किती यश मिळते, हे पाहणे उत्‍सुकतेचे ठरणार आहे.
लोकपालमुळे पोलिसही नेत्यांना टाकतील तुरुंगात- लालू, मुलायम यांची भीती
मुलायम कठोर झाले : अखिलेशला अमेरिकेत न जाण्याचा आदेश