आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘साकी के जाम’मधील नशा उतरणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मदहोश नशेसाठी जास्त अल्कोहोल मिसळलेली स्ट्राँग बिअर प्यायची तुम्हाला सवय असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी नाही. सरकार बिअर, रम, व्होडका आणि जिनमध्ये मिसळल्या जाणा-या अल्कोहोलच्या प्रमाणासाठी मापदंड निश्चित करणार असून निर्धारित मापदंडाएवढेच अल्कोहोल मिसळण्यात आले की नाही यावर बारीक नजरही ठेवणार आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरण (एफएसएसएआय) सर्व प्रकारच्या नशेच्या पेयांमध्ये मिसळण्यात येणा-या अल्कोहोलसाठी मापदंड तयार निश्चित करू लागले आहे. त्या मापदंडानुसारच दारूच्या या बाटल्यांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण ठेवणे बंधनकारक केले जाणार आहे. याचाच अर्थ बिअरमध्ये ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जास्त अल्कोहोल मिसळता येणार नाही. हा राज्याचा विषय असल्यामुळे त्याबाबत राज्य सरकारचेही काही निर्देश असले तरी आजपर्यंत मुख्यत: दारू उत्पादक कंपन्याच विविध प्रकारच्या दारूमधील अल्कोहोलचे प्रमाण ठरवत होत्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात होत असलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत दारूमधील अल्कोहोलच्या प्रमाणाच्या मापदंडांना अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या अल्कोहोलच्या मापदंडांची अंमलबजावणी देशी दारूची निर्मिती करणा-या कंपन्यांपासून ते बिअर, व्हिस्की, रम, व्होडका, जिनचे उत्पादन करणा-या कंपन्यांनाही अनिवार्यपणे करावी लागणार आहे. नशेचे पेयांपुरतेच मर्यादित मापदंड तयार केले जाणार नसून अन्न आणि पाण्यासाठीही स्वतंत्र मापदंड निश्चित करण्यात येणार आहेत. याचाच अर्थ दारूच्या बाटलीतील प्रत्येक घटकावर सरकारचे नियंत्रण येणार आहे. प्राधिकरणाच्या शास्त्रज्ञांनी या मापदंडांवर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
किती असते अल्कोहोल ?
भारतात तयार करण्यात येणा-या व्हिस्की, रम, व्होडका आणि जीनच्या डिस्टिल्ड स्पिरिटमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 45.5 टक्के तर बिअरमध्ये 8 ते 12 टक्के असते. नव्या मापदंडांनुसार हे प्रमाण नियंत्रित होणार आहे.