आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन चॉकलेट जगतावर भारतीयांची पकड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयटीसह अनेक क्षेत्रांसोबतच आता अमेरिकेतील चॉकलेट जगतावर भारतीयांनी आपली छाप उमटवली आहे. न्यूयॉर्कमध्ये प्रतिस्पर्धी चॉकलेट मार्केटमध्येही दोन भारतीय उद्योजकांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. 27 वर्षी अदिती मल्होत्रा व 24 वर्षीय शैनील शहा ही दोन नावे अमेरिकन चॉकलेट जगतात लोकप्रिय म्हणून पुढे आली असून त्यांनी तयार केलेल्या चॉकलेट्सची मागणी वाढतच आहे.
न्यूयॉर्कमध्ये जवळपास 100 मोठे चॉकलेट स्टोअर्स आहेत. त्यापैकी बहुतांश चॉकलेट स्टोअर्सची मालकी कुण्या कंपनीकडे नव्हे तर व्यक्तीकडे आहे. यात दोन स्टोअर्स शैनील व अदितीचे आहेत. त्यांनी उत्पादन केलेल्या चॉकलेटना अमेरिकेसह अन्य शहरे, देशांतही मागणी येत आहे. शैनील व अदिती यांच्या नावाचा उल्लेख नील अलेव्हा यांनी त्यांच्या ‘द अल्टिमेट गाइड टू फायंडिंग चॉकलेट इन न्यू यॉर्क सिटी’ या पुस्तकातही केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अमेरिकेत सर्वात महागड्या चॉकलेटचे स्टोअर्स हे न्यूयॉर्क शहरातच आहेत.
चॉकलेट जगतात अतिशय कमी कालावधीत वेगळा ठसा उमटवणारे शैनील शहा व अदिती मल्होत्रा यांचे वय बरेच कमी म्हणजे अनुक्रमे 27 व 27 वष्रे आहे. शैनील मूळचा गुजरातचा आहे. 2009 मध्ये अर्थशास्त्राची पदवी संपादन केल्यानंतर शैनील नोकरीच्या शोधात फिरत होता. या काळात त्याने त्याच्या आईकडून चॉकलेट बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. नंतर त्याने याच व्यवसायात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. शैनीलने चॉकलेट बनवण्याचे व्यावसायिक प्रशिक्षणही घेतले. स्वत: तयार केलेले चॉकलेट त्याने सर्वप्रथम ट्रेड शोमध्ये सादर केले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. शैनीलने ‘चॉकलेटी’ नावाचे मोठे स्टोअर्स न्यूयॉर्कमध्ये सुरू केले. आज त्याच्या ‘चॉकलेटी’चा या क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे.
अदिती मल्होत्राचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून अन्न प्रक्रियेशी संबंधित उद्योगात आहे. अदितीचे कुटुंबीय 1970 पासून न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट व्यवसाय चालवतात. शाळेतून आल्यावर अदिती दररोज या हॉटेलच्या किचनमध्ये विविध प्रकारच्या डिशेस तयार करत होती. या छंदानेच तिला या क्षेत्रात उतरण्यास प्रवृत्त केले. अदितीने फ्रान्समध्ये याचे रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये येऊन स्वत:चे चॉकलेट स्टोअर सुरू केले. तिने तयार केलेल्या चॉकलेट्सनीही खवय्यांना भुरळ पाडली आहे.
- शैनील शहाचे वय 24 वर्ष आहे. शैनील मूळचा गुजरातचा आहे. 2009 मध्ये ग्लोबल आर्थिक संकटामुळे नोकरी मिळाली नाही म्हणून चॉकलेटचे प्रशिक्षण घेतले व नंतर या क्षेत्रात प्रवेश.
- अदिती मल्होत्राचे वय 27 वर्ष आहे. सत्तरच्या दशकापासून अदितीचे कुटुंब न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट चालवते. अदितीने फ्रान्समध्ये या व्यवसायाचे रीतसर प्रशिक्षण घेत न्यू यॉर्कमध्ये चॉकलेट स्टोअर्स सुरू केले.