आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amid Attack Fears, People From Ne Flee Bangalore

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार, लष्कर तैनात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने दावा केला होता की, पुर्वोत्तर राज्यातील लोकांना देशात कोणताही धोका नाही. असे असतानाही गुरुवारी आसाममध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.
गुरुवारी सुरु झालेला हिंसाचार बुधवारी रात्री एका व्यक्तिवर झालेल्या हल्ल्याच्या प्रतुत्तरात केला गेला. बुधवारी रात्री बक्शामध्ये एका व्यक्तीवर हल्ला झाला आणि एक नॅनो कार जाळण्यात आली होती. गुरुवारी जमावाने अनेक बस आणि लाकडी पुल आगीच्या भक्षस्थानी दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड अँक्शन फोर्स आणि लष्कराला तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या, देशातील इतर शहरांमध्ये राहात असलेल्या पुर्वोत्तर भागातील विद्यार्थी आणि नागरिकांना धमकीची पत्र मिळत आहेत. त्यांना सांगितले जात आहे की, तुम्ही शहर सोडा अन्यथा हिंसाचाराचा सामना करा. स्वराज यांनी या प्रकरणी सरकारने कडक कारवाईची मागणी केली आहे.

आसामच्या बोडोलँड (बीटीसी) मध्ये २० जुलै पासून हिंसाचार भडकला आहे. यात आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यू झाला असून साडेचार लाखाहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या दंगलीनंतर हजारो परिवारांना मदत शिबीरांमध्ये शरण जावे लागले आहे.
नॉर्थ-इस्टच्या खासदारांनी सर्व धर्मियांना अवाहन केले आहे की, देशाच्या विविध भागात राहाणा-या पुर्वोत्तर भागातील नागरिकांवर कोणीही हल्ले करु नयेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
धगधगते आसाम : विस्थापित भयभीतच
थेट आसामहून : ना घुसखोर जाणार, ना होणार आसाम शांत
आसाम मध्ये लष्कराच्या काफिल्यावर हल्ला, एक जवान शहिद
अशांत आसाम : मनमोहन सिंग-सोनिया गांधी कोकराझारला पोहोचले