आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amir Khan Purchases Old Bollywood Things In An Auction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शम्‍मी कपूरचे जॅकेज आमिर खानकडुन खरेदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मि. परफेक्शनिस्ट आमीर खान सामाजिक संस्थांना दान करताना मोठा हातभार लावतो. याबरोबर चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्याबद्दल आदरभाव व्यक्त करत आमीर त्यांचा मौलिक ठेवा आपल्याजवळ बाळगण्यासाठी मागेपुढेही पाहत नसल्याचा प्रयत्न मंगळवारी येथे आला. ओसियन सिनेफॅन लिलावामध्ये आमीर व त्याची पत्नी किरण रावने बॉलीवूडमधील 2 लाख 38 हजार रुपयांच्या वस्तू बोली लावून खरेदी केल्या. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांच्या जॅकेटचा समावेश आहे. आमीरने जॅकेटसाठी 88 हजार रुपये मोजले.
ओसियन चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून बॉलिवूडमधील अनेक ऐतिहासिक वस्तूंचा लिलाव करण्यात आला. लिलावातून 69.55 लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली. गुडगाव येथील झुमरू संगीत कार्यक्रमाच्या प्रमुखाने किशोर कुमार यांचे शेवटचे प्रसिद्ध न झालेल्या गाण्याचे हक्क 15.6 लाख रुपयांत विकत घेतले. लिलावात ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये दुर्मिळ पोस्टर्स, शो कार्ड, चित्रासह अन्य वस्तूंचा समावेश होता. सदाबहार अभिनेते देव आनंद यांची स्वाक्षरी असलेली 45 कृष्णधवल छायाचित्रे, सत्यजित रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली 1960 मधील पोस्टर्स तसेच आमीर आणि त्याच्या संघाने सही केलेली लगानमधील बॅट ह्या वस्तू लिलावत ठेवण्यात आल्या होत्या.
AAMIR SPL : आंदोलनासाठी अभिनयाला रामराम ठोकणार नाही - आमिर खान
सामाजिक मुद्दा लोकांना पटवून देणे अवघड : आमिर
शिखरावरून का गडगडला आमिर खानचा शो?
आमिर खानच्या मुलाची बी टाऊनमध्ये एन्ट्री !