आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आयएमए’ची माफी मागणार नाही - आमिर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानने इंडियन मेडिकल असोसिएशनची(आयएमए) माफी मागण्यास नकार दिला आहे. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून वैद्यकीय पेशा बदनाम झाल्याचा आरोप आयएमएने केला आहे. आयएमएच्या कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी आमिरने दर्शविली आहे.
मी काही चूक केली आहे असे आयएमएला वाटत असेल तर त्यांनी सरळ कायदेशीर कारवाई करावी. त्याला तोंड देण्यास मी तयार आहे. मी कदापिही त्यांची माफी मागणार नाही, असे आमिर खानने एका वृत्त वाहिनीला सांगितले. आमिरने आपल्या कार्यक्रमाद्वारे वैद्यकीय व्यवसाय बदनाम केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमिर म्हणाला की, मी बदनामी केली नाही. वैद्यकीय व्यवसायाविषयी मला संपूर्ण आदर आहे. 27 मे रोजीच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात आमिर खानने वैद्यकीय क्षेत्रातील गैरप्रकार उघड केले होते.कार्यक्रमानंतर आयएमएने आमिरला तत्काळ माफी मागण्यास सांगितले होते. आमिरने कार्यक्रमाद्वारे व्यवसायाची एक बाजू दाखविली आहे. दुसरी बाजू दाखविली नाही. वैद्यकीय व्यवसायाचे नीतिधैर्य खच्ची केल्याबद्दल त्याने माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयएमएचे सरचिटणीस डॉ. डी.आर. राय यांनी म्हटले आहे.