आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
हैदराबाद/ बंगळुरू - कमल हसनचा वादग्रस्त चित्रपट ‘विश्वरूपम’च्या प्रदर्शनाला तामिळनाडूमध्ये दोन आठवड्यांपासून बंदी घालण्यात आल्यानंतर हैदराबाद व बंगळुरू शहरात सुरक्षा कारणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले आहे. मुस्लिम समाजाच्या निदर्शनांनंतर तामिळनाडूमध्ये बंदी घालण्यात आली. केरळमध्ये मात्र पूर्वनियोजनानुसार ‘विश्वरूपम’चा शो सुरू झाला. प्रदर्शनाला बंदी घालण्यात आली नाही; परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडेल या भीतीपोटी हैदराबादमध्ये एका दिवसाने चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
शो उद्यापासून : कर्नाटकमध्ये विश्वरूपम रविवारी प्रदर्शित होणार आहे. प्रशासनाने ईद व प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शन पुढे ढकलण्याची विनंती केली होती. दरम्यान, कमल हसनने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.